S M L

जवानांसोबत सेल्फी घ्या- गौतम गंभीर

याबाबतचा एक व्हिडिओच त्याने ट्विट केलाय. ज्यामध्ये त्याने लोकांना काही प्रश्नही विचारलेत.

Sonali Deshpande | Updated On: May 31, 2017 01:37 PM IST

जवानांसोबत सेल्फी घ्या- गौतम गंभीर

31 मे : सध्या गौतम गंभीर हा त्याच्या बोलण्यातून किंवा प्रत्यक्ष कृतीतून भारतीय जवानांबाबत आपल्या भावना व्यक्त करताना दिसतोय. आणि आता पुन्हा एकदा गंभीरने जवानांबाबतच ट्विटरवरून लोकांना एक आवाहन केलंय. त्यात गंभीरने असं म्हटलंय की, प्रत्येक भारतीयाने जवानांबद्दल आदर व्यक्त करायला हवा. त्यासाठी जेव्हा एखादा जवान आपल्याला दिसेल तेव्हा त्याचे आभार मानायला हवेत. तसंच जवानांसोबत सेल्फी घेण्याचं आवाहनही त्याने यावेळी केलंय.

याबाबतचा एक व्हिडिओच त्याने ट्विट केलाय. ज्यामध्ये त्याने लोकांना काही प्रश्नही विचारलेत.

सुकुमा येथे मावोवाद्यांच्या हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं याअगोदरच गंभीरकडून सांगण्यात आलं होतं. आणि आता पुन्हा एकदा गंभीरने इमोशनल व्हिडिओ ट्विट करत जवानांविषयीची त्याची भावना व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close