S M L

शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात आम्ही अपयशी, कृषीमंत्र्यांची कबुली

शेतकऱ्यांना स्वामीनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव देण्याचं आश्वासन देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला गेल्या 3 वर्षांत शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यात मात्र अपयश आलंय.

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2018 05:13 PM IST

शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात आम्ही अपयशी, कृषीमंत्र्यांची कबुली

08 जानेवारी : शेतकऱ्यांना स्वामीनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव देण्याचं आश्वासन देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला गेल्या 3 वर्षांत शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यात मात्र अपयश आलंय. तशी कबुलीच देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यसभेत दिलीये.

शेतकऱ्यांच्या मालाला भावाची हमी देण्याचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं आता शेतकऱ्यांना हमीभाव देणं अशक्य असल्याचं आधी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आणि आता देशाच्या केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंगांनी हमीभाव देवू शकलो नाही अशी जाहीर कबुलीच दिलीये.

यंदा देशात चांगला पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या हातात चांगलं पीक आलं. पण शेतकऱ्यांना त्याचा माल कवडीमोल दरानं विकावा लागला. याचं कारण सरकारचं धोरण आहे. हे सरकार पिकवणाऱ्यांच्या बाजूचं नाही अशी बोचरी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी केलीय.

केंद्रातल्या मोदी सरकारनं अगोदर स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव आणि नंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देशातल्या शेतकऱ्यांना दिलंय. पहिलं आश्वासन न्यायालयातून निकाली काढल्यानंतर आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं जातंय. पण प्रश्न आहे. भाव नसेल तर उत्पन्न वाढणार कसं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close