S M L

मानलं सरपंचसाहेबांना, पायावर उभा राहू न शकणारा अविनाश झाला गावाचा कारभारी !

राजकारण हे गरीबांचं राहिलेलं नाही हा डायलॉग मारून पळ काढणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. वाशीम जिल्ह्यातल्या शेंदूरजना मोरे गावातील गावकऱ्यांनी गावाचा सरपंच निवडलाय. ही निवड म्हणजे लोकशाहीतला चमत्कार आहे.

Sachin Salve | Updated On: Oct 11, 2017 05:33 PM IST

मानलं सरपंचसाहेबांना, पायावर उभा राहू न शकणारा अविनाश झाला गावाचा कारभारी !

 

मनोज जैस्वाल,वाशीम

11 आॅक्टोबर : राजकारण हे गरीबांचं राहिलेलं नाही हा डायलॉग मारून पळ काढणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. वाशीम जिल्ह्यातल्या शेंदूरजना मोरे गावातील गावकऱ्यांनी गावाचा सरपंच निवडलाय. ही निवड म्हणजे लोकशाहीतला चमत्कार आहे.

लोकशाहीत जनता बळ देते तेव्हा पाय नसलेली माणसंही खंबीरपणे उभी राहतात आणि जनता नाकारते तेव्हा भलेभले अधू होऊन घरी बसतात. आपल्या लोकशाहीचं हेच सामर्थ्य वाशीम जिल्ह्यातल्या शेंदूरजना मोरे गावात पाहायला मिळालंय.  जन्मापासूनच्या दिव्यांगामुळे स्वत:च्या पायावर उभा राहू न शकणारा अविनाश धामंदे गावाचा कारभारी बनलाय.

एकदा निवडून गेलेल्या लोकांनी मागे फिरुन पाहिलं नाही म्हणून गावाची व्यवस्था पंगू बनली. याच अस्वस्थतेतून अंथरुणात पडलेला अविनाश धीरोदात्तपणे निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिला.  गावानं त्याला साथ दिली...पायात बळ दिलं.

जनतेतून सरपंच निवडण्याचा सरकारनं निर्णय घेतल्यावर घराणेशाही, मनी आणि मसलपॉवरच्या जीवावर निवडणुका जिंकल्या जातील अशी भीती व्यक्त होत होती. पण शेंदूरजना मोरे गावच्या मतदारांनी भल्या भल्यांना बाजूला सारत अविनाशला उचलून धरलं आणि चमत्कार घडवला. परिस्थितीपुढे गुढघे टेकणाऱ्या अनेकांच्या पायात अविनाशच्या विजयानं बळ आलं असेल यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close