S M L

शेतकरी आत्महत्या देखाव्याचं केलं अनुकरण, गमावला जीव

गणेशोत्सवातल्या शेतकरी आत्महत्या देखाव्याचं अनुकरण करणाऱ्या मुलाचा मृत्यू झालाय.

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2017 08:28 PM IST

शेतकरी आत्महत्या देखाव्याचं केलं अनुकरण, गमावला जीव

तुषार तपासे,सातारा

04 सप्टेंबर : गणेशोत्सवातल्या शेतकरी आत्महत्या देखाव्याचं अनुकरण करणाऱ्या मुलाचा मृत्यू झालाय. साताऱ्यातल्या गोरेगाव वांगी गावात ही घटना घडलीये.

गणेशोत्सवातला शेतकरी आत्महत्येच्या या देखाव्याचं अनुकरण 13 वर्षांच्या सुमित शिंदेच्या जीवावर बेतलंय. साताऱ्यातल्या गणपती मंदिर मंडळासमोरचा देखावा पाहण्यासाठी गोरेगाव वांगीतला सुमित गेला होता. तिथून परत आल्यानंतर घरात कुणीही नसताना सुमितनं या देखाव्याचं अनुकरण केलं.

समाज प्रबोधनाच्या हेतुने गणेशोत्सवात वेगवेगळ्या विषयांवर आधारीत देखावे सादर केले जातात. या देखाव्यातून संदेश घेण्याऐवजी सुमितनं अनुकरण केलं आणि जीव गमावून बसला असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 08:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close