S M L

जिजाऊंचं जन्मगाव सिंदखेडराजाच्या विकासाचा सरकारला पडला विसर !

मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्यानंतर 311 कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा केली. पण तीन वर्षात या घोषणेचं काहीच झालं नाही.

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2018 10:23 PM IST

जिजाऊंचं जन्मगाव सिंदखेडराजाच्या विकासाचा सरकारला पडला विसर !

प्रफ्फुल खंडारे,बुलढाणा

09 जानेवारी : जिजाऊंचं जन्मगाव असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा गावातला राजवाडा विकास आराखड्याच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी विकास आराखड्याची घोषणा केली. पण ही घोषणा हवेतच विरलीय.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सत्ताधारी राज्यशकट हाकतात. त्याच सत्ताधाऱ्यांना जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजाच्या विकासाचा विसर पडलाय. मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्यानंतर 311 कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा केली. पण तीन वर्षात या घोषणेचं काहीच झालं नाही. याबाबत स्थानिक आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे.

दरवर्षी 12 जानेवारीला होणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी लाखो शिवप्रमी सिंदखेडराजा गावात येतात. पण येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोणत्याच मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. विकास आराखड्याबाबत एक दोन बैठका झाल्याचं नगराध्यक्ष सांगतात. पण त्या बैठकीला आपल्याला बोलावलं नसल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केलाय.

शिवप्रेमींसाठी सिंदखेडराजा पंढरीसमान आहे. सिंदखेडराजाच्या विकासाच्या दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांनी का होईना पूर्तता करावी अशी अपेक्षा शिवप्रेमींमधून व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2018 09:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close