S M L

साताऱ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 महिन्यात 69 गर्भपात !

दोषीच्या विरोधात खुद्द कुटुंब कल्याणच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी अहवाल दिला आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2017 11:06 PM IST

साताऱ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 महिन्यात 69 गर्भपात !

तुषार तपासे, सातारा

09 नोव्हेंबर : साताऱ्यातील तरडगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 महिन्यात 69 गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. डॉ.अनिल कदम याने गर्भपात करताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घालून दिलेले कोणतेच नियम पळाले नसल्याचं समोर आलं आहे. दोषीच्या विरोधात खुद्द कुटुंब कल्याणच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी अहवाल दिला आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

तरडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.अनिल कदम यांनी कोणत्याही तपासण्या न करता खोटी कारणं देऊन हा गर्भपात केल्याचं डॉ.प्रवीण कदम यांनी माहितीच्या अधिकारात उघड केलं आहे. अगदी वरिष्ठाना कोणतीही पूर्व सूचना न देता डॉ.अनिल कदम यांनी तब्बल 105 MTP किट मागवले. त्यातील 61 किट म्हणजेच गर्भपाताच्या औषधाचा वापर करण्यात आला.

मात्र त्याची कोणतीही नोंद या प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आली नाही. महत्त्वाचं म्हणजे MTP किटचा वापर हा 6 महिन्यापेक्षा मोठं अर्भक काही अपरिहार्य कारणांनी पाडायचं असेल तरच त्याचा उपयोग केला जातो.

कुटुंब कल्याणच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी या बाबत नेमलेल्या 5 सदस्य समितीने दिलेल्या अहवालात अनेक ठिकाणी डॉ. अनिल कदम दोषी असल्याचा निष्कर्ष दिला आहे.

एका छोट्याशा आरोग्य केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशासनाला अंधारात ठेवून निष्काळजी पणे गर्भपात केले जात होते आणि तसे पुरावे मिळून देखील डॉ.अनिल कदम आणि त्यांच्या सहकारी यांच्यावर कधी कारवाई होणार हाच प्रश्न विचारला जातो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 11:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close