S M L

...आणि गिळलेलं हरीण अजगराने ओकलं

लोणावळ्याजवळच्या बेडसे लेण्यांजवळ एका अजगराची वनविभाग आणि सर्पमित्रांनी सुटका केलीये

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2017 09:58 PM IST

...आणि गिळलेलं हरीण अजगराने ओकलं

अनिस शेख, लोणावळा

06 जुलै : लोणावळ्याजवळच्या बेडसे लेण्यांजवळ एका अजगराची वनविभाग आणि सर्पमित्रांनी सुटका केलीये. या अजगरानं मोठ्या हरणाची शिकार केली. पण ही शिकार त्याच्याच चांगली अंगलट आली होती.

वडिलधाऱ्या माणसांनी म्हटलंय 'जे झेपल तेच करावं आणि पचल तेच खावं...' पण या म्हणीचा आणि या अजगर महाशयांचा काही संबंध असल्याचं दिसत नाही. मावळातल्या बेडसे लेण्यांजवळ हा अजगर दिसून आला. आता हेच पाहा ना....या अजगरानं ना स्वतःचा आकार पाहिला ना स्वतःची कुवत...दिसलं हरण पकडलं आणि गिळूनही टाकलं बरं का?...पण नंतर लक्षात आलं हे काही पचायचं नाही. अजगराला हलता सुद्धा येत नव्हतं. मग काय खाल्लेलं हरीण पुन्हा बाहेर काढण्याची वेळ अजगरावर आली.

शेवटी तेरा फुटी अजगराला वनविभागाच्या हवाली करण्यात आलंय. मोठ्या आकाराच्या हरणाची शिकार करणं अजगराला चांगलंच महागात पडलंय.  किमान आताच्या अनुभवावरुन तरी हे अजगर महाशय धडा घेतील अशी अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close