S M L

पिंपरीत भंगार गोदामाला भीषण आग

Samruddha Bhambure | Updated On: Mar 6, 2017 09:26 AM IST

पिंपरीत भंगार गोदामाला भीषण आग

06 मार्च :  पिंपरी चिंचवडमध्ये आज पुन्हा एकदा मोठी आग लागली आहे. चिखली, कुदळवाडीत भंगार सामानाच्या गोदामाला काल रात्री 12 च्या सुमारास मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे 15 बंब रात्रीपासून आग विझवत असूनही अद्याप ती विझलेली नाही. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 या आगीत गोदामाची सुमारे 20 ते 25 दुकानेजळून खाक झाली आहेत. सुरुवातीला फायरब्रिगेडच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आगीचे स्वरूप पाहून गाड्यांची संख्या वाढवण्यात आली. आगीच्या ज्वाळा दूर अंतरावरूनही दिसत होत्या.

आग सकाळपर्यंत आटोक्यात आली असली तरी पूर्णपणे विझलेली नाही. गोदामात भंगार मालाचा मोठा साठा असल्याने ही आग विझवायला किमान अजून 5 तास लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत. पुण्यातले दोन मोठे फायर इंजिनही घटनास्थळी पोहोचलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2017 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close