S M L

पोलिसाच्या मुलाच्या कारनं शबा शेखला उडवलं,आरोपी अजून मोकाट

Sonali Deshpande | Updated On: Mar 4, 2017 03:32 PM IST

पोलिसाच्या मुलाच्या कारनं शबा शेखला उडवलं,आरोपी अजून मोकाट

04 मार्च : पुण्यातल्या येरवडा परिसरात रस्ता क्रॉस करणाऱ्या मुलीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले.ही धडक इतकी जोरात होती की बावीस वर्षाची शबा शेख तब्बल दहा फूट लांब उडून पडली. कारचालक अभिमन्यू जगताप मात्र न थांबता पसार झाला. सव्वीस फेब्रुवारीला दुपारी ही घटना घडली आहे. आणि एफआयआर मात्र दोन मार्चला रात्री उशिरा दाखल झालाय.

कारण कार चालवणारा केवळ एकोणीस वर्षांचा मुलगा हा येरवडा जेलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप जगताप यांचा मुलगा आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आणि दबाव आणत असल्याचा आरोप शबाच्या घरच्यांनी केला आहे.

लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द असलेल्या शबा शेख सध्या बारावीच्या परीक्षेची तयारी करत होती.क्लास संपवून ती घरी जाण्यासाठी बाहेर तर पडली, मात्र घरी न जाता तिला दवाखान्यात नेण्याची वेळ आली. गंभीर जखमी असलेल्या शबाला ठिकठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत आणि प्रकृती नाजूक आहे. तिच्यावर तब्बल सहा सर्जरी कराव्या लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

शबाच्या घरच्यांपुढे इतके पैसे आणायचे कुठून हाच प्रश्न आहे.तर प्रदीप जगताप हे 'मी दवाखान्याचा खर्च देईन' असे सांगत इतके दिवस शबाच्या घरच्यांना शांत बसायला सांगत होते. कोणतीही चूक नसताना शबाला आणि तिच्या घरच्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याचवेळी ज्याच्या मस्तवाल गाडी चालवण्यामुळे ही घटना घडली, तो अभिमन्यू जगताप मात्र बाहेर मोकाट फिरत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2017 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close