S M L

पुण्यात काँग्रेस उमेदवार धंगेकर आणि भाजप नेते बीडकर यांच्यामध्ये हाणामारी

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2017 10:41 PM IST

पुण्यात काँग्रेस उमेदवार धंगेकर आणि भाजप नेते बीडकर यांच्यामध्ये हाणामारी

07 फेब्रुवारी : पुण्यातील कसबा रस्तापेठ प्रभाग क्रमांक 16 मधील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे नेते गणेश बीडकर यांच्यात घोलेरोड क्षेत्रीय कार्यलयात हाणामारी झाली.

काँग्रेसकडून या प्रभागातून आरीफ बागवान यांनी देखील अर्ज भरला होता. मात्र आरीफ बागवान यांनी आपला अर्ज मागे घ्यावा असं धंगेकर कार्यालयातचं त्यांना सांगत होते. यावेळी भाजपचे नेते गणेश बीडकर तेथे पोहचले आणि बागवान काँग्रेसकडून तूच लढ असं बोललं. यावर धंगेकर चिडले आणि बीडकरांना हाणामारी करण्यास सुरुवात झाली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सर्व वाद शांत झाला. अखेर आता बागवान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्यामुळे धंगेकर हेच काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 07:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close