S M L

टाकीवर चढलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने वाचवलं

Sachin Salve | Updated On: Nov 26, 2016 08:03 PM IST

टाकीवर चढलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने वाचवलं

26 नोव्हेंबर : पुण्याच्या खडकी बाजार इथल्या पाण्याच्या टाकीवरुन आत्महत्या करण्यासाठी तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या हिंमतीने वाचवलं. अमर गोप नारायण असं या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्यासाठी गेल्यानंतर अमर बेशुद्ध पडला. त्याला सुरक्षितपणे टाकीवरुन अग्निशमन दलाच्या जवानांनी खाली उतरवलं. हा सगळा थरार कॅमे-यात कैद झालाय.

खडकी बाजार इथल्या पाण्याच्या टाकीवर शोलेस्टाईल आत्महत्या करण्यासाठी अमर नारायण तरुण चढला होता. याबद्दलची ही माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर औंध अग्निशमन केंद्रातून जवानांनी तातडीने धाव घेतली.

तिथे गेल्यावर नारायण बेशुद्ध झाल्याचं लक्षात आलं. आणि प्रसंगावधान दाखवत टाकीवर चढून फायर ब्रिगेडनं त्याला इसमास दोर आणि सेफ्टी बेल्टच्या साह्याने बांधून त्याला सुमारे दोनशे फूट खाली जमिनीवर सुरक्षित सोडण्यात आलं. या कामगिरीमध्ये दलाचे चालक अनिल निकाळजे आणि जवान शत्रुग्न वाजे, मधुकर मते, महेश चिरगुटे, काळुराम मोहिते यांनी सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2016 08:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close