S M L

पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये नवजात मुलीचा उपचाराअभावी मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Nov 20, 2016 07:40 PM IST

पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये नवजात मुलीचा उपचाराअभावी मृत्यू

Ruby hospital2131

20 नोव्हेंबर :  वेळेवर उपचार न झाल्यानं पुण्यात एका नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलनं पैसे भरा नंतरच ऑपरेशन करू अशी भूमिका घेतल्यानं उपचारांअभावी बाळाचा मृत्यू झाला.

हॉस्पिटल्स जिवनदायी असतात. पण पुण्यातलं हे रुबी हॉस्पिटल एका बाळाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं आहे.  पुण्यातल्या आम्रपाली खुंटे यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या ह्रदयात जन्मजात दोष असल्यानं तिच्यावर तातडीनं उपचार करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. खुंटे कुटुबीयांनी तातडीनं रुबी हॉस्पिटल गाठलं. रुबी हॉस्पिटल व्यवस्थापनाने साडेतीन लाख रुपये भरण्यास सांगितले होते. नोटाबंदीमुळे तातडीनं पैशाची व्यवस्था होत नव्हती. हॉस्पिटल प्रशासन पैसे भरा नंतरच ऑपरेशन करु यावर अडून बसलं होतं.  त्यामुळे संबंधित बालकावर उपचार होऊ शकले नाही, असा आरोप त्या बालिकेच्या कुटुंबीयांनी केला.आधीच तोळामासा प्रकृती असलेल्या बाळाचा पहाटे मृत्यू झाला.

दरम्यान, बाळ रुबीत आणलंच नाही, त्यामुळं बाळाच्या मृत्यूला हॉस्पिटल जबाबदार नसल्याचा दावा रुबी हॉस्पिटलनं केलाय. व्यावसायिकपणा असावा पण कुणाचा जीव जाईल एवढा तो नसावा. व्यावसायिक मुल्य जपण्याच्या नादात रुबी हॉस्पिटलनं माणुसकी मात्र गमावलीये असं खेदानं म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2016 07:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close