S M L

'पुणे तिथे काय उणे', एक तिकीट 'स्वर्गात'चं द्या !

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2016 11:43 PM IST

'पुणे तिथे काय उणे', एक तिकीट 'स्वर्गात'चं द्या !

pune_bus04 नोव्हेंबर : पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. पुण्यातील इंद्रधनुष्य बससेवेतून तुम्हाला आता स्वर्गाची सफर घडू शकते दचकू नका...!! हे खरंच पुणेकरांनी करून दाखवलंय. पण तुम्हाला स्वारगेटला उतरावं लागेल एवढीचं शेवटीच अट आहे...

सध्या पुण्यातून थेट स्वर्गात जाण्यासाठी 'इंद्रधनुष्य' बससेवा बीआरटीने सुरू केलीये. तुम्हाला जर स्वर्गात जाणारी ही बस पकडायची असेल तर तुम्हाला विश्रांतवाडी मार्गावरील बीआरटी थांब्यावर याव लागेल. पण, हो खरंच बसमध्ये बसलात तर तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला स्वर्गाच्या नावाखाली स्वारगेटची सफर घडवली जाईल.

त्याचं झालं असं की, बसमध्ये इंडिकेटवर इंग्रजीसह मराठी भाषेतही थांब्याचा उल्लेख करण्यात आलाय. पण, इथं इंडिकेटरमध्ये साॅफ्टवेअरमध्ये भाषेचा लोचा झाला. स्वारगेटचं झालं स्वर्गात... मग ही चूक पुणेकरांनी सोशल मीडियावर चांगलीच चघळली. बीआरटीची  इंडिकेटरवरची एक चूक आज दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2016 10:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close