S M L

एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या,घराशेजारीच पुरले मृतदेह

पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह गाडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. खेड तालुक्यातल्या कुरकुंडी गावात ही घटना घडलीये

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2017 07:29 PM IST

एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या,घराशेजारीच पुरले मृतदेह

28 मार्च : पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह गाडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. खेड तालुक्यातल्या कुरकुंडी गावात ही घटना घडलीये.

तालुक्यातील कुरकुंडी इथं रोहिदास गोगावले, मंदा गोगावले आणि त्यांची मुलगी अंकिता गोगावले यांची हत्या करण्यात आलीये. या तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह घराशेजारच्या शेत जमिनीत गाडून टाकण्यात आले होते. झालेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुरलेले मृतदेह बाहेर काढले.

या प्रकरणी पोलिसांनी मृत रोहिदास यांच्या सावत्र मुलाला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलंय. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close