S M L

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्या दोषी

10 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Samruddha Bhambure | Updated On: May 9, 2017 03:31 PM IST

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्या दोषी

09 मे : देशातील विविध बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून परदेशी पळालेला उद्योगपती विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायायलयानं विजय मल्ल्याला दोषी ठरवलं असून 10 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायलयाचा अवमान आणि डिएगो व्यवहारातून मिळालेल्या 40 मिलीयन यूएस डॉलसबद्दल निकाल रोखून ठेवत असल्याचं सुप्रिम कोर्टाने म्हटलं होतं. मल्ल्याला डिएगो करारातून मिळालेले 40 मिलीयन डॉलर सुप्रिम कोर्टाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी बँकांकडून करण्यात आली आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2017 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close