S M L

भारत-चीन सीमेवरील तणावाबद्दल केंद्रीय नेतृत्वाने काळजी घ्यावी -शरद पवार

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2017 07:57 PM IST

भारत-चीन सीमेवरील तणावाबद्दल केंद्रीय नेतृत्वाने काळजी घ्यावी -शरद पवार

06 जुलै : सिक्कीममधून सैन्य काढून घेण्याबाबत चीनने जो इशारा दिलाय तो देशाच्या सार्वभौमत्वासाठी योग्य नाही अशी चिंता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. तसंच सीमेवर चीनच्या आगळीक होणार नाही याची काळजी केंद्रीय नेतृत्वाने घ्यावी असा सल्लावजा टोलाही पवारांनी लगावला.

डोकलाम मुद्यावर चीनची आगळीक सुरूच आहे. भूतानचा डोकलामवरचा दावा चुकीचा असल्याचा दावा चीनने केलाय. एवढंच नाहीतर भारत डोकलामच्या सीमेवरून आपलं सैन्य मागे घेत नाही तोपर्यंत उभय देशांतील संबंध पूर्ववत होणं अशक्य असल्याची दर्पोक्ती चीनने या निवेदनातून व्यक्त केलीय.

चीनच्या या वाढत्या कुरापत्याबद्दल शरद पवारांनी चिंता व्यक्त केलीये. सिक्कीममधून सैन्य काढून घेण्याबाबत चीनने जो इशारा दिलाय तो देशाच्या सार्वभौमत्वासाठी योग्य नाही असं शरद पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close