S M L

भिरामध्ये विक्रमी तापमानाची नोंद, तज्ज्ञांचे पथक उद्या रायगडात

रायगड जिल्ह्यातील भीरा इथे तब्बल 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

Samruddha Bhambure | Updated On: Mar 30, 2017 12:37 PM IST

भिरामध्ये विक्रमी तापमानाची नोंद, तज्ज्ञांचे पथक उद्या रायगडात

30 मार्च : राज्यात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील भीरा इथे तब्बल 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

या वाढत्या तापमानासंदर्भात अभ्यास करण्यासाठी वेधशाळेतील तज्ज्ञांचे पथक उद्या मुंबईहून रायगडमध्ये येणार आहे. त्यानंतर या जीवघेण्या तापमानाविषयीचा अहवाल सादर करण्यात येईल. राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे तापमान 40 अंशांच्यावर पोहोचले आहे. बीड आणि धुळे येथे उष्माघाताने 2 जणांचा बळी गेला आहे.

राज्यातही अनेक शहरांच्या तापमानानं चाळीशी ओलांडली आहे. मुंबईसह मराठवाडा, विदर्भ सध्या कडाक्याचा उकाडा आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे.  पुणे, जळगाव, मालेगाव, सोलापूर यांच्यासह नाशिक आणि सातारा येथेही कमाल तापमान ४० अंश से. वर पोहोचले.

मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंश से. वर राहिले. त्यामानाने कोकणातील कमाल तापमान मंगळवारी काहीसे कमी झाले होते. मार्च महिन्यापासून अकोला चांगलंच तापायला लागलं आहे. तापमान सारखं वाढत असल्याने लोकांची दैनंदिन कामकाजात धावपळ उडतेय. सलग 3 दिवसांपासून अकोल्याचा तापमान 42 अंशाच्यावर चढतंय, आजचं तापमान सुद्धा 42 अंशाच्यावर चढलंय, त्यामुळे उन्हापासून बचावासाठी लोक विविध उपाय शोधतायेत.

दरम्यान जगभरातल्या तापमानात वाढ होतीये. विशेषत: कोलकत्यासारखी शहरे तर या उष्णतेच्या लाटेत होरपळणार असल्याचा इशाराही संशोधकांनी दिलाय. 2015 मध्ये कोलकाता शहरात दोन हजार नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पॅरिस कराराचे पालन न केल्यास जागतिक तापमानवाढ होतच राहणार असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close