S M L

ड्रग्ज विकणाऱ्याचे जमावाने तोडले हातपाय !

पंजाबच्या बठिंडामध्ये ड्रग्ज विकणाऱ्या एकाला जमावानं अमानुष मारहाण केली. कहर म्हणजे जमावाने त्याचा एक हात आणि पायाचा काही भाग कापून टाकला

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2017 09:12 PM IST

ड्रग्ज विकणाऱ्याचे जमावाने तोडले हातपाय !

09 जून : पंजाबच्या बठिंडामध्ये ड्रग्ज विकणाऱ्या एकाला जमावानं अमानुष मारहाण केली. कहर म्हणजे जमावाने त्याचा एक हात आणि पायाचा काही भाग कापून टाकला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विनोद कुमार नावाचा ड्रग्ज तस्कर नुकताच जेलमधून सुटला होता. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पुन्हा ड्रग्ज विक्रीचा धंदा सुरू केला. बठिंडामध्ये त्याला ड्रग्ज विकतांना लोकांनी पकडलं आणि चांगलीच धुलाई केली. लोकांनी त्याचा एक हात आणि पायाचा भाग कापून टाकला.  त्याला पोलिसांनी रुग्णलयात दाखल केलं. पण त्याच्यावर उपचार होतायेत म्हणून जमाव पुन्हा संतापला. मग त्याला फरीदकोटला नेण्यात आलं.  पण काही तासांत त्याचा मृत्यू झाला.३ दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटला होता. ड्रग्जच्याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2017 09:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close