S M L

पाकिस्तान हा चांगला देश नाही, मृत्यूचा सापळा आहे; उजमाचा थरारक अनुभव

पाकिस्तान हा मृत्यूचा सापळा आहे. जे मुस्लिम आहे त्यांना पाक चांगला देश वाटतोय पण असं काही नाही.

Sachin Salve | Updated On: May 25, 2017 09:57 PM IST

पाकिस्तान हा चांगला देश नाही, मृत्यूचा सापळा आहे; उजमाचा थरारक अनुभव

25 मे : पाकिस्तानमध्ये जाणं सोपं आहे पण तिथून परत येणं अवघड आहे. पाकिस्तान हा मृत्यूचा सापळा आहे. जे मुस्लिम आहे त्यांना पाक चांगला देश वाटतोय पण असं काही नाही. पाकिस्तानला जाऊ नका अशी कैफियत पाकिस्तानामधून परतलेल्या उजमाने भारतात आल्यावर मांडली.

पाकिस्तानमध्ये अडकलेली भारतीय महिला उजमा आज भारतात परतली. सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीत तिचं स्वागत केलं. पाकिस्तनात महिलाच काय पण पुरुषही सुरक्षित नाहीयेत अशी कैफियत तिने मांडली.

3 मे रोजी उजमा पाकिस्तानात फिरायला गेली. तिथे ती एका टॅक्सी चालकाच्या प्रेमात पडली. त्यानं बळजबरीनं तिच्याशी लग्न केलं. उजमा अडकली. तिनं एक शक्कल लढवली. माझ्या व्हिजाचं काम करायला मला भारतीय उच्चायुक्तांकडे जायचंय, असं तिनं सांगितलं. आणि उच्चायुक्त कार्यालयात तिनं आपली व्यथा सांगितली आणि बाहेर गेलीच नाही. तेव्हापासून ती तिथेच होती. सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान गृह मंत्रालयाचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2017 09:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close