S M L

मोहरी भारतातलं पहिलं जनुकीय सुधारित खाद्यतेल बनण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: May 12, 2017 12:45 PM IST

मोहरी भारतातलं पहिलं जनुकीय सुधारित खाद्यतेल बनण्याची शक्यता

12 मे : मोहरी हे भारतातलं पहिलं जनुकीय सुधारित खाद्यतेल बनण्याची शक्यता आहे. भारतातली जैवतंत्रज्ञान नियामकाची जेनेटीक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटीनं मोहरीच्या जनुकीय सुधारणेला परवानगी दिली आहे. आता यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पर्यावरण मंत्रालयाकडे आहे. पण याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्रालय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहण्याची शक्यता आहे.

यापूर्वी वांग्याच्या जनुकीय सुधारणेला परवानगी मिळाली होती. पण पर्यावरण मंत्रालयानं त्याला मंजुरी दिली नव्हती. सध्या बीटी कॉटन हे एकमेव जनुकीय सुधारित वाण भारतात उपलब्ध आहे. पण ते मॉन्सेन्टो या आंतरराष्ट्रीय कंपनीनं विकसित केलं होतं. सध्याचं मोहरीचं वाण दिल्ली विद्यापीठाच्या एका संस्थेनं विकसित केलं आहे.

'जीएम' पिकांचा फायदा काय?

- भारतात मॉन्सेन्टो या आंतरराष्ट्रीय कंपनीनं बीटी कॉटन विकसित केलं

- बीटी कॉटनमुळे कापसाची 450 कोटींची उलाढाल 4 हजार कोटींवर पोहोचली

- सध्या सुमारे देशातला ९० टक्के कापूस हा मॉन्सेन्टो कंपनीने विकसित केलेल्या बियाण्यांवर निघतो

- जनुकीय बदलामुळे पिकाच्या पारंपरिक वाणातले दोष दूर करता येतात

- वाणांना किड आणि इतर रोगांचा सामना करायला सक्षम बनवता येतं

- पिकांच्या जनुकीय बदलामुळे धान्यांच्या उत्पादनात वाढ शक्य होते

'जीएम' पिकांना विरोध का?

- मोहरीच्या जनुकीय सुधारणेला स्वदेशी जागरण मंचसह अनेक संघटनांचा विरोध

- यापूर्वी वांग्याची जनुकीय सुधारणा हाणून पाडण्यात आली होती

- जीएम पिकांमुळे जैवविविधतेला धक्का बसेल असा विरोधकांचा दावा

- शेतीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राची घुसखोरी होईल असा आक्षेप

- स्वदेशीवाद आणि बहुराष्ट्रीय कंपन्या असा वाद रंगवला जातोय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2017 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close