S M L

मुंबईकरांसाठी खूशखबर ! 'मोडक सागर' ओव्हरफ्लो

आज सकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी मोडक सागर धरणाचे दरवाजे उघडले गेले. या तलावातून मुंबईला दररोज 455 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो.

Chandrakant Funde | Updated On: Jul 15, 2017 01:35 PM IST

मुंबईकरांसाठी खूशखबर ! 'मोडक सागर' ओव्हरफ्लो

मुंबई, 15 जुलै : मुंबईला पाणी पुरवठा करणारा मोडक सागर ओव्हरफ्लो झालाय. आज सकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी धरणाचे दरवाजे तुडूंब भरून वाहू लागलेत. या तलावातून मुंबईला दररोज 455 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. या तलाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अन्य तलावांमध्येही पाण्याची पातळी वाढत असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटणार आहे.

या तलावापाठोपाठ मुंबईतील विहार तलावही लवकरच भरून वाहण्याच्या मार्गावर आहे. मात्र मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख दशलश लीटर जलसाठा असणे अवाश्यक आहे.

मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईत पाण्याची मागणी दररोज 4200 दशलश लीटर एवढी आहे. दररोज 25 ते 30 टक्के म्हणजे सुमारे नऊशे लीटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जाते.

तलावातील जलसाठा

मोडकसागर ९४,४९६ दशलक्ष लीटर

तानसा १,०५,०२८ दशलक्ष लीटर

विहार ११,०७९ दशलक्ष लीटर

तुलसी ३,८५० दशलक्ष लीटर

अप्पर वैतरणा ६४,४३१ दशलक्ष लीटर

भातसा ३,२३,६१८ दशलक्ष लीटर

मध्य वैतरणा १,८१,४९७ दशलक्ष लीटर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2017 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close