S M L

होय, संजय निरुपम यांच्या कार्यालयावर आम्हीच सर्जिकल स्ट्राईक केलाय- संदीप देशपांडे

मुंबई काँग्रेस कार्यालयावर मनसेनं हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. याबाबत स्वतः संदीप देशपांडेंनी ट्विट करून याबाबतची माहिती दिलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक.. इट का जवाब पथ्थर से मिलेगा..असा या ट्विटचा मजकूर आहे. दरम्यान, काँग्रेसने या तोडफोडीचा तीव्र निषेध केलाय. पोलिसांनीही तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय. 

Chandrakant Funde | Updated On: Dec 1, 2017 12:36 PM IST

होय, संजय निरुपम यांच्या कार्यालयावर आम्हीच सर्जिकल स्ट्राईक केलाय- संदीप देशपांडे

01 नोव्हेंबर, मुंबई : मुंबई काँग्रेस कार्यालयावर मनसेनं हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. याबाबत स्वतः संदीप देशपांडेंनी ट्विट करून याबाबतची माहिती दिलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक.. इट का जवाब पथ्थर से मिलेगा..असा या ट्विटचा मजकूर आहे. काँग्रेसने या तोडफोडीचा तीव्र निषेध केलाय. पोलिसांनीही तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय. दरम्यान, पोलिसांनी मनसेचं कार्यालय राजगड आणि काँग्रेस कार्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवलाय.

फेरीवाल्यांच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांच्यात उभा संघर्ष पेटलाय. याच वादातून हा हल्ला झाल्याचं स्पष्ट झालंय.. हल्ला झाला त्यावेळी काँग्रेसच्या कार्यालयात कोणीच उपस्थित नव्हतं. त्यामुळे या तोडफोडीत कोणीच जखमी झालेलं नाही.

दरम्यान  मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close