S M L

जीएसटीमुळे 'चैन' महागणार

चैन करणे हे भारतीय मध्यमवर्गासाठी यापुढे स्वप्नही ठरू शकते.

Sonali Deshpande | Updated On: Jun 26, 2017 01:20 PM IST

जीएसटीमुळे 'चैन' महागणार

25 जून : 1जुलैपासून भारतात जीएसटी कर प्रणाली लागू होणार आहे. या करामुळे  अनेक गोष्टी महागणार आहे तर अनेक गोष्टी स्वस्तही होणार आहे .पण चैन करणे हे भारतीय मध्यमवर्गासाठी यापुढे स्वप्नही ठरू शकते.

सर्कसींचा काळ संपवणारे अम्युजमेंट पार्क ,रिसॉर्ट्स , ही मन रमवण्याची एन्जोयमेंटची नवी ठिकाणं झाली आहेत.पण हेच अम्युजमेंट पार्क आता मध्यमवर्गासाठी खरच एक 'अम्युजमेंट' ठरू शकते कारण या पार्क्सवर आता 28 टक्के टॅक्स लागणार आहे .आतापर्यंत यांच्यावर 15 टक्के टॅक्स लागत होता.

जर तुम्हाला क्रिकेटचे सामने बघायला स्टेडियमवर जायला आवडत असेल किंवा कलाकारांचे कॉन्सर्ट आनंद देत असतील तर हा आनंदही आता दुरापास्त होऊ शकतो.कारण क्रिकेट सामन्यांवर 28 टक्के तर कॉन्सर्ट्सवर 20 टक्के कर लागणार आहे. तर भारतीय कलाप्रकारांच्या कॉन्सर्टवर 18 टक्के टॅक्स बसणार आहे.तसंच एसी रेस्टॉरंटवर 18 टक्के आणि नॉन एसी रेस्टॉरंटवर 20टक्के कर बसणार आहे.

एकंदर 1 जुलैपासून चैन ही 'चैन' नक्कीच राहणार नाही .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close