S M L

मुंबई पावसाचे अपडेट्स Live

मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना पुन्हा एकदा 26 जुलै 2005च्या पावसाची आठवण करून दिली. गेल्या 24 तासात मुंबई तब्बल 225पेक्षा जास्त मिमि. पावसाची नोंद झाली. सकाळच्या तीन तासात तब्बल 65 मिमि. पाऊस कोसळला.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 29, 2017 11:25 PM IST

मुंबई पावसाचे अपडेट्स Live

Highlight

Aug 30, 2017

 • 17:08(IST)

  उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
   

 • 17:05(IST)

  मुंबईकरांना आम्ही वाऱ्यावर सोडलं नाही, शिवसैनिक, आमदार, नगरसेवकांनी काल मुंबईकरांची सेवा दिली - उद्धव ठाकरे

 • 17:01(IST)

  रोगराई येवू नये म्हणून तातडीची बैठक स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू - उद्धव ठाकरे
   

 • 17:00(IST)

  काल एवढा पाऊस झाला ते आज जाणवत नाही, 26 जुलैपासून आम्ही खूप काही शिकलो - उद्धव ठाकरे

 • 17:00(IST)

  मी मुंबईकरांना बांधिल आहे, खेद प्रगट करणं हे कमी पणाचं नाही, नालेसफाईत कमतरता नाही - उद्धव ठाकरे

 • 13:15(IST)

  मी मुंबईकरांची माफी का मागू ?

   मुंबईच्या महापौरांची दर्पोक्ती

 • 13:14(IST)

  उद्धव ठाकरे 3 वाजता महापौर बंगल्यावर
   घेणार आढावा बैठक

 • 12:14(IST)

  मध्य आणि हार्बर रेल्वे पुन्हा रखडली

  तांत्रिक अडचणीमुळे लोकल अडकल्या

 • 12:05(IST)

  मंगळवारी मुंबईत असा झाला पाऊस

 • 11:54(IST)

  गाड्या पावसामुळे अडकल्या असतील तर गाडीत पेट्रोल किंवा डिझेल संपलं असेल तर नजीकच्या पेट्रोल पंपापर्यंत किंवा गॅरेजपर्यंत पोलीसांतर्फे मोफत टोईंगची सोय. १०० किंवा 8454999999 या नंबरवर संपर्क साधण्याचं मुंबई पोलिसांचं आवाहन

 • 11:53(IST)

  मुंबईत काल झालेल्या पावसानं ठिकठिकाणी वाहनं बंद पडली होती. ती हटवण्याचं काम मुंबई पोलीस अथकपणे करत आहेत. सायन, माटुंगा परिसरात मुंबई पोलिसांनी जवळपास २६ वाहनं रस्त्यावरून दूर केली आहेत.

 • 11:28(IST)

  कुर्ल्याहुन -सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ठप्प  https://goo.gl/28hMhW

      #मुंबईपाऊसअपडेट्स :  #MumbaiRains

 • 10:02(IST)

  मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या रेल्वेचं वेळापत्रक

 • 09:45(IST)
 • 09:44(IST)

मुंबई,29 ऑगस्ट: मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना पुन्हा एकदा 26 जुलै 2005च्या पावसाची आठवण करून दिली. गेल्या 24 तासात मुंबई तब्बल 225पेक्षा जास्त मिमि. पावसाची नोंद झाली. सकाळच्या तीन तासात तब्बल 65 मिमि. पाऊस कोसळला. अशातच दुपारी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान हायटाईड आल्याने शहरातील रस्त्यांवरील पूरस्थिती आणखीनच गंभीर बनली. त्यामुळे फक्त लोकल रेल्वेसेवाच नाहीतर सावर्जणिक रस्तेवाहतूकही कोलमडून पडलीय, सगळीकडे रस्त्यांवर जणू पूरस्थितीच बघायला मिळत होती.

लोअर पारेल, दादर, कूर्ला, अंधेरी, खार पश्चिम, घाटकोपर, सायन आणि हिंदमाता परिसरात शेकडो वाहनं पावसाच्या पाण्यात अडकून पडल्याचं बघायला मिळालं. कित्येक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. लोकल ट्रेन्स, बीएसटी, टॅक्सी अशी सगळीच वाहतूक सेवा बंद असल्याने दक्षिण मुंबईत कार्यालयात अडकून पडलेल्या शकडो मुंबईकांना उपनगरातील घरांकडे जाणं जवळपास अशक्य होऊन बसलं तर नजीकच्या परिसरात राहणारी लोकं सरळ रस्त्यावरच्या पाण्यातूनच वाट काढत पाईच घराकडे निघाल्याचं बघायला मिळालं. रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा सुरळीत होऊ शकली नव्हती. अशातच हवामान विभागाने बुधवारीही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने उद्याचा दिवस मुंबईकरांसाठी आणखी कसोटी पाहणारा असणारा आहे.

पावसात अडकलेल्यांसाठी अन्नदानाची सोय

पावसाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांनी पावसात रेल्वेस्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी मोफत जेवणाची सोय उपल्बध करून देण्यात आलीय. लालबाग आणि सिद्धीविनायक गणपती मंडळांनी याकामात पुढाकार घेतला. मोफत अन्नदान आणि निवाऱ्याच्या सोयीमुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंद

सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन राज्याच्या शिक्षण विभागाने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यायांना सुटी जाहीर केलीय.तसंच गरज असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं असं, आवाहन महापालिकेनं केलंय.

मुंबईसाठी नो एन्ट्री

मुंबईतील पुरस्थिती गंभीर बनल्याने पुणे आणि नाशिकहून मुंबईकडे येणारी हायवे वाहतूक सेवा थांबवण्यात आलीय. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्यात. तसंच पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन या दोन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यात.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2017 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close