S M L

गेला पाऊस कुणीकडे...?

महाराष्ट्रात मान्सून धडाक्यात आला खरा पण आता तो गायब झालाय. गेल्या काही दिवसांपासून कोकणातून पाऊसच गायब झालाय.

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2017 08:36 PM IST

गेला पाऊस कुणीकडे...?

दिनेश केळुसकर, सुरभी शिरपुरकर

19 जून : तो आला तो धडाक्यात बरसला....पण तो आता गायब झालाय...जोरदार एंट्री करणारा पाऊस आता एकदम गायब झालाय. तर दुसरीकडे विदर्भातल्या भंडारा गोंदियात तर अजुन पावसाने तोंड ही दाखवलं नाहीये.. त्यामुळे बळीराजा व्याकुळ झालाय.

महाराष्ट्रात मान्सून धडाक्यात आला खरा पण आता तो गायब झालाय. गेल्या काही दिवसांपासून कोकणातून पाऊसच गायब झालाय. त्यामुळे पेरलेल्या भातांच्या रोपांना सरींची रिमझीम नाही तर आता कडक ऊन पाहावं लागतंय. पाऊस नसल्यानं शेतीची कामंही खोळंबलीत. येत्या दोन चार दिवसांत पाऊस झाला नाही तर भाताच्या रोपांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

मान्सूननं कोकण आणि उत्तर महाराष्ट्र व्यापून टाकलाय पण तिथेही पाऊस पडत नाहीये तर विदर्भाच्या काही भागात अजून मान्सूनचा पत्ताच नाही. बुलडाणा वाशिममध्ये मान्सूनचा पाऊस झाला. पण गोंदिया आणि भंडाऱ्यातल्या शेतकरी मान्सूनची अजुनही वाट पाहत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 08:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close