S M L

अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या 75 बसेसची खरेदी

मुंबई महापालिकेने 100 कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून या बसेस खरेदी केल्या आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Apr 24, 2017 12:25 PM IST

अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या 75 बसेसची खरेदी

24 एप्रिल : ऐन उन्हाळ्यात तोट्यातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट प्रशासनानं मुंबईतील AC बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता बेस्ट प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे बेस्ट प्रशासनानं अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या 75 बसेस खरेदी केल्या आहेत. मुंबई महापालिकेने 100 कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून या बसेस खरेदी केल्या आहेत.

मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण होणार आहे. एकीकडे आर्थिक अडचणीचं कारण देत आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार 3 महिने रखडवला होता, तर दुसरीकडे बेस्टच्या ताफ्यातील AC बसेस बंद करण्याचा निर्णय घेतल्याने बेस्ट प्रशासन चर्चेत राहिलं होतं. बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी मात्र प्रवाशांच्या सोयीसाठीच आम्ही बसेस खरेदी केल्या असल्याचं सांगितलं आहे.

कशी आहे नवीन बस?

- मोबाइल चार्जिंगची सोय

- लोकल ट्रेनच्या धर्तीवर हवेचे झोत

- ऑटोमॅटिक क्लच

- बस चालकांसाठी आरामदायी  खुर्ची

- बसमध्ये एल इ डी लाइटचा वापर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close