S M L

बंगळुरूमध्ये महिला सुरक्षेसाठी पिंक पोलीस पेट्रोल व्हेईकल्स

बंगळुरू पोलिसांनी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत.

Sonali Deshpande | Updated On: Apr 11, 2017 02:06 PM IST

बंगळुरूमध्ये  महिला सुरक्षेसाठी पिंक पोलीस पेट्रोल व्हेईकल्स

11 एप्रिल : बंगळुरू पोलिसांनी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत. त्यासाठी महिलांसाठी एक नवं अॅप तयार करण्यात आलंय आणि महिला पोलिसांसाठी 51 नव्या गाड्याही सेवेत भरती करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये जीपीएस आहे.

म्हणजे एखाद्या महिलेनं आणीबाणीच्या वेळी अॅपवर माहिती टाकली, तर ती महिला कुठे आहे, हे गाडीतल्या स्क्रीनवर कळेल. त्यासाठी महिलेला फोन करण्याची गरज नाही. मारुती अर्टिगा आणि टोयोटा एटियॉस गाड्या यासाठी घेण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close