S M L

वीज कनेक्शन घेण्याअगोदरच मिळाले 1 हजार रुपयांचे बिल

24 नोव्हेंबरपुण्यात महावितरण कंपनीनं भोंगळ कारभाराचा अजब प्रकार पाहायला मिळाला. वीज मीटर जोडण्यापूर्वीच ग्राहकाला एक हजार रुपयांचं बिल पाठवल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. प्रकाश पाटील यांनी महावितरण कंपनीकडे वीज मीटरसाठी अर्ज केला होता. पण मीटर जोडण्यापूर्वीच महावितरणनं त्यांना वीजबिल पाठवलं. याबद्दल तक्रार केल्यानंतर महावितरणनं तातडीने सुट्टीच्या दिवशीच वीजमीटर जोडून दिलं.मात्र झालेल्या प्रकारामुळे पाटील यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2012 02:58 PM IST

वीज कनेक्शन घेण्याअगोदरच मिळाले 1 हजार रुपयांचे बिल

24 नोव्हेंबर

पुण्यात महावितरण कंपनीनं भोंगळ कारभाराचा अजब प्रकार पाहायला मिळाला. वीज मीटर जोडण्यापूर्वीच ग्राहकाला एक हजार रुपयांचं बिल पाठवल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. प्रकाश पाटील यांनी महावितरण कंपनीकडे वीज मीटरसाठी अर्ज केला होता. पण मीटर जोडण्यापूर्वीच महावितरणनं त्यांना वीजबिल पाठवलं. याबद्दल तक्रार केल्यानंतर महावितरणनं तातडीने सुट्टीच्या दिवशीच वीजमीटर जोडून दिलं.मात्र झालेल्या प्रकारामुळे पाटील यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2012 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close