S M L

सुशीलकुमारने पटकावले सिल्व्हर मेडल

12 ऑगस्ट भारताचा स्टार कुस्तीपटू सुशीलकुमारने मिशन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावले आहे. कुस्तीमध्ये 66 किलो पुरषांच्या फायनलमध्ये जपानच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्कारावा लागला आहे. या पराभवामुळे सुशीलकुमारचे गोल्ड मेडलचे स्वप्न मात्र पुर्ण झाले नाही. सुशीलकुमार हा पहिला भारतीय कुस्तीपटू आहे ज्याने ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल पटकावले आहे. दिल्ली सरकारने सुशीलकुमारला एक कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.आज रविवारी ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत सुशीलकुमारने कजाकिस्तानच्या अकझूरेक तानातारोवचा 3-1 असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश करत एक मेडल पक्क केलं होतं. फायनलमध्ये सुशीलचा सामना जपानच्या तासुहिरो योनेमित्सु सोबत झाला. पण या सामन्यात सुशीलला पराभवाला सामोरं जावं लागलं. पण सुशीलने सिल्व्हर मेडल पटकावत कुस्तीत भारताचे नाव उंचावले आहे. भारताच्या खात्यात आता 2 सिल्व्हर आणि 4 कास्य मेडल मिळून एकूण 6 मेडल जमा झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2012 03:07 PM IST

सुशीलकुमारने पटकावले सिल्व्हर मेडल

12 ऑगस्ट

भारताचा स्टार कुस्तीपटू सुशीलकुमारने मिशन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावले आहे. कुस्तीमध्ये 66 किलो पुरषांच्या फायनलमध्ये जपानच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्कारावा लागला आहे. या पराभवामुळे सुशीलकुमारचे गोल्ड मेडलचे स्वप्न मात्र पुर्ण झाले नाही. सुशीलकुमार हा पहिला भारतीय कुस्तीपटू आहे ज्याने ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल पटकावले आहे. दिल्ली सरकारने सुशीलकुमारला एक कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

आज रविवारी ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत सुशीलकुमारने कजाकिस्तानच्या अकझूरेक तानातारोवचा 3-1 असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश करत एक मेडल पक्क केलं होतं. फायनलमध्ये सुशीलचा सामना जपानच्या तासुहिरो योनेमित्सु सोबत झाला. पण या सामन्यात सुशीलला पराभवाला सामोरं जावं लागलं. पण सुशीलने सिल्व्हर मेडल पटकावत कुस्तीत भारताचे नाव उंचावले आहे. भारताच्या खात्यात आता 2 सिल्व्हर आणि 4 कास्य मेडल मिळून एकूण 6 मेडल जमा झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2012 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close