S M L

नाशिकबाबत मनसेचं वेट अँड वॉच !

09 मार्चएकीकडे शिवसेनेची ही तयारी सुरू असतानाच मनसेने मात्र आपलं नेहमीचं वेट अँड वॉच धोरण स्विकारलं आहे. ठाण्यामध्ये आपण आपल्या सद्सद्विवेकबिुद्धीला स्मरून आणि जनमताचा आदर करून विकासाच्या मुद्यावर महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे याच मुद्यावर महायुतीनेनाशिकमध्ये मनसेला पाठिंबा द्यावा अशी मनसेची अपेक्षा असल्याचं कळतंय. मात्र मनसेनं नाशिकसाठी विचारणा केली तर त्याबाबत विचार करू असं उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सांगितलं होतं. पण मनसेकडून कोणतंही शिष्टमंडळ अथवा पाठिंब्याचा कोणताही प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला जाणार नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे नाशिकचा महापौर कोणाचा होणार याबाबत उत्सुकता कायम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 09:40 AM IST

नाशिकबाबत मनसेचं वेट अँड वॉच !

09 मार्च

एकीकडे शिवसेनेची ही तयारी सुरू असतानाच मनसेने मात्र आपलं नेहमीचं वेट अँड वॉच धोरण स्विकारलं आहे. ठाण्यामध्ये आपण आपल्या सद्सद्विवेकबिुद्धीला स्मरून आणि जनमताचा आदर करून विकासाच्या मुद्यावर महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे याच मुद्यावर महायुतीनेनाशिकमध्ये मनसेला पाठिंबा द्यावा अशी मनसेची अपेक्षा असल्याचं कळतंय. मात्र मनसेनं नाशिकसाठी विचारणा केली तर त्याबाबत विचार करू असं उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सांगितलं होतं. पण मनसेकडून कोणतंही शिष्टमंडळ अथवा पाठिंब्याचा कोणताही प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला जाणार नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे नाशिकचा महापौर कोणाचा होणार याबाबत उत्सुकता कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close