S M L

कलमाडींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा !

30 एप्रिलकॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले खासदार सुरेश कलमाडींनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता पुण्यामध्ये जोर धरत आहे. विरोधी पक्षांनी तर ही मागणी केलीच आहे. पण आता त्यांच्याबरोबर सामान्य पुणेकरही सहभागी झाले आहेत. कलमाडींनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी घोरपडे पेठमध्ये मतदान घेण्यात आलं. साधारण 4 तास चाललेल्या या मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. चारच तासांमध्ये 4,800 पुणेकरांनी मतदान केलं. यातल्या 4000 हून अधिक लोकांनी कलमाडींनी राजीनामा द्यायलाच हवा असं मत नोंदवलं. तर फक्त 557 लोकांनी राजीनामा देऊ नये असं मतदान केलं. आज मतदानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपली भुमिका मांडली. तर दुसरीकडे रविवारी फेसबुकच्या माध्यमातून नेटिझन्सनी उभारलेल्या आंदोलनातून शनिवारवाड्यावर पुणेकर जमणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2011 03:38 PM IST

कलमाडींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा !

30 एप्रिल

कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले खासदार सुरेश कलमाडींनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता पुण्यामध्ये जोर धरत आहे. विरोधी पक्षांनी तर ही मागणी केलीच आहे. पण आता त्यांच्याबरोबर सामान्य पुणेकरही सहभागी झाले आहेत. कलमाडींनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी घोरपडे पेठमध्ये मतदान घेण्यात आलं.

साधारण 4 तास चाललेल्या या मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. चारच तासांमध्ये 4,800 पुणेकरांनी मतदान केलं. यातल्या 4000 हून अधिक लोकांनी कलमाडींनी राजीनामा द्यायलाच हवा असं मत नोंदवलं. तर फक्त 557 लोकांनी राजीनामा देऊ नये असं मतदान केलं. आज मतदानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपली भुमिका मांडली. तर दुसरीकडे रविवारी फेसबुकच्या माध्यमातून नेटिझन्सनी उभारलेल्या आंदोलनातून शनिवारवाड्यावर पुणेकर जमणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2011 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close