S M L

बोली भाषेला कमी लेखू नका -उत्तम कांबळे

25 डिसेंबरसंमेलनाध्यक्षाच्या खुर्चावरुन बोलतांना उत्तम कांबळे यांनी मराठी साहित्याचं परखड विश्लेषण केले. आजच्या जगण्याची गती मराठी साहित्यात नाही म्हणून मराठी साहित्य मागे पडलं असं परखड मतं उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं. साहित्यिक समाजापासून दूर जातोय अशी खंतही उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली.माझं आयुष्य घडवण्यात अनेकजणांनी हातभार लावला आहे. नारायण सुर्वे, कुसुमाग्रज आणि बाबुराव बागुल यांनी माझ्या लेखणीला आकार दिला अशी कृतज्ञता संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. आपल्या जीवनप्रवासाचा धावता आढावाच त्यांनी यावेळी मांडला. तसेच ठाणे शहरातून पुरोगामी विचाराचा प्रसार झाल्याचे कांबळे म्हणाले. तर बेळगाव महाराष्ट्राचाच भाग असल्याचं कांबळे म्हणाले. दरम्यान, मराठी शाळांना मान्यता मिळावी यासाठी कांबळे यांच्या भाषणापूर्वी घोषणाबाजी करण्यात आली. साहित्य सूर्य नारायण सुर्वे मंडपात उत्तम कांबळे यांचं बहुमोल अध्यक्षीय भाषण झाले. सुरुवातीला त्यांनी ठाण्याचं ऐतिहासिक महत्त्व सांगितलं. ठाण्यातून पुरोगामी विचारांचा प्रसार झाला आहे. नारायण सुर्व्यांमुळे ठाण्याशी भावनीक नातं आहे.आपल्याला आयुष्यांनी खूप काही शिकवलं खूप काही पाहील आहे. माझं आयुष्य घडवण्यात अनेकजणांनी हातभार लावला आहे. नारायण सुर्वे, कुसुमाग्रज आणि बाबुराव बागुल यांनी माझ्या लेखणीला आकार दिला अशी कृतज्ञता संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. आजकाल हॉटेल मध्ये मेनु कार्ड मध्ये खाद्यपदार्थ्यांची नावंही आता जाती वरुन ठेवली जात आहे. आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे असंही त्यांनी सांगितलं. तसेच समाजात फुट पाडणार्‍यांना साहित्यिकांनी थांबवलं पाहिजे. साहित्यिकांनी साहित्यामधून भूमिका मांडली पाहिजे नाही तर मोठे अपघात होतील. बदलत्या काळाचा विचार मराठी साहित्यात आलेले नाही. त्यामुळे मराठी साहित्य मागं पडलंय असं परखड मतही त्यांनी मांडले. साहित्यिक सर्व समावेशक असायला हवा. राजकारणाबाबत बोलताने कांबळे म्हणाले की, राजकारणापासून साहित्यिकांनी दूर राहू नये, राजकारण हे फक्त संसद आणि ग्रामपंचायतीमध्ये नसतं.त्यांनी ही साहित्यात सहभाग घ्यावा. तसेच मराठी भाषेच्या मुद्यावर आज आपल्याला बोली भाषेला महत्त्व आलं पाहिजे. बेळगाव हा महाराष्ट्राचाच आहे त्यांबद्दल जो सीमावाद सुरु आहे तो सुटला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 07:48 AM IST

बोली भाषेला कमी लेखू नका -उत्तम कांबळे

25 डिसेंबर

संमेलनाध्यक्षाच्या खुर्चावरुन बोलतांना उत्तम कांबळे यांनी मराठी साहित्याचं परखड विश्लेषण केले. आजच्या जगण्याची गती मराठी साहित्यात नाही म्हणून मराठी साहित्य मागे पडलं असं परखड मतं उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं. साहित्यिक समाजापासून दूर जातोय अशी खंतही उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली.

माझं आयुष्य घडवण्यात अनेकजणांनी हातभार लावला आहे. नारायण सुर्वे, कुसुमाग्रज आणि बाबुराव बागुल यांनी माझ्या लेखणीला आकार दिला अशी कृतज्ञता संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. आपल्या जीवनप्रवासाचा धावता आढावाच त्यांनी यावेळी मांडला. तसेच ठाणे शहरातून पुरोगामी विचाराचा प्रसार झाल्याचे कांबळे म्हणाले. तर बेळगाव महाराष्ट्राचाच भाग असल्याचं कांबळे म्हणाले. दरम्यान, मराठी शाळांना मान्यता मिळावी यासाठी कांबळे यांच्या भाषणापूर्वी घोषणाबाजी करण्यात आली.

साहित्य सूर्य नारायण सुर्वे मंडपात उत्तम कांबळे यांचं बहुमोल अध्यक्षीय भाषण झाले. सुरुवातीला त्यांनी ठाण्याचं ऐतिहासिक महत्त्व सांगितलं. ठाण्यातून पुरोगामी विचारांचा प्रसार झाला आहे. नारायण सुर्व्यांमुळे ठाण्याशी भावनीक नातं आहे.आपल्याला आयुष्यांनी खूप काही शिकवलं खूप काही पाहील आहे. माझं आयुष्य घडवण्यात अनेकजणांनी हातभार लावला आहे. नारायण सुर्वे, कुसुमाग्रज आणि बाबुराव बागुल यांनी माझ्या लेखणीला आकार दिला अशी कृतज्ञता संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

आजकाल हॉटेल मध्ये मेनु कार्ड मध्ये खाद्यपदार्थ्यांची नावंही आता जाती वरुन ठेवली जात आहे. आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे असंही त्यांनी सांगितलं. तसेच समाजात फुट पाडणार्‍यांना साहित्यिकांनी थांबवलं पाहिजे. साहित्यिकांनी साहित्यामधून भूमिका मांडली पाहिजे नाही तर मोठे अपघात होतील. बदलत्या काळाचा विचार मराठी साहित्यात आलेले नाही. त्यामुळे मराठी साहित्य मागं पडलंय असं परखड मतही त्यांनी मांडले. साहित्यिक सर्व समावेशक असायला हवा. राजकारणाबाबत बोलताने कांबळे म्हणाले की, राजकारणापासून साहित्यिकांनी दूर राहू नये, राजकारण हे फक्त संसद आणि ग्रामपंचायतीमध्ये नसतं.त्यांनी ही साहित्यात सहभाग घ्यावा. तसेच मराठी भाषेच्या मुद्यावर आज आपल्याला बोली भाषेला महत्त्व आलं पाहिजे. बेळगाव हा महाराष्ट्राचाच आहे त्यांबद्दल जो सीमावाद सुरु आहे तो सुटला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 07:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close