S M L

'चंद्रकांत खैरे को गुस्सा क्यू आया',पोलिसाची धरली काॅलर

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2017 07:27 PM IST

'चंद्रकांत खैरे को गुस्सा क्यू आया',पोलिसाची धरली काॅलर

21 मार्च : 'खासदार चंद्रकांत खैरे को गुस्सा क्यू आया...' असा प्रकारच औरंगाबाद जिल्हा परिषद् निवडणुकीमध्ये घडला. औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्यालयाचा गेट बंद करण्यावरुन पोलीस आणि खैरेंमध्ये वादावादी झाली. यावेळी चंद्रकांत खैरेंनी पोलीस हवालदाराची कॉलरच धरली.

त्याचं झालं असं की,  जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीसाठी झेडपी मुख्यालयात पोलीस कर्मचारी तैनात होते. तीन वाजता झेडपीचे गेट बंद करण्याचे पोलिसांना आदेश होते. पण पोलिसांनी गेट पाच मिनिटं अगोदरच बंद केलं. त्यामुळे शिवसेना सदस्य बाहेर अडकून पडले.  सेना सदस्यांनी गेट उघडण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी गेट उघडण्यास नकार दिला. खैरे यांना हा प्रकार कळला आणि त्यांनी गेटकडे धाव घेतली. खैरे संताप करीत गेट जवळ पोहचले मात्र गेट बंद करण्यात आला होता पोलीस गेट उघडायला तयार नव्हते.

चंद्रकांत खैरे आणि यांनी गेट जवळ उभ्या असलेल्या पोलिसांमध्ये यावरुन वाद झाला. एवढंच नाहीतर खैरे यांनी एका हवालदाराची काॅलर पकडली. खैरे यांचा रुद्र अवतार बघून पोलीस यांनी लगेच गेट उघडला. आणि सेना सदस्य सभागृहात पोहचले. पोलिसांना हाती धरून सेना सदस्यांना  मतदानापासून रोखायचं अशी भाजपची चाल होती असा आरोप खैरे यांनी केला. विशेष म्हणजे याआधीही खैरे यांनी एका अधिकाऱ्याची काॅलर पकडली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 07:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close