S M L

सुनीलपाठोपाठ चंदनही करणार कपिलला गुडबाय

Sonali Deshpande | Updated On: Mar 21, 2017 05:49 PM IST

सुनीलपाठोपाठ चंदनही करणार कपिलला गुडबाय

21 मार्च : कपिल शर्माच्या शोचा सगळा सेट तयार होता. 'नाम शबाना'च्या प्रमोशनसाठी तापसी पन्नू आणि मनोज वाजपेयी पोचले होते.लाइट, कॅमेरा,अॅक्शनची तयारी झाली होती. पण विनोदवीर सुनील ग्रोवर आणि चंदन प्रभाकर यांचा पत्ताच नव्हता. काॅल टाइमप्रमाणे ते पोचलेच नव्हते.

कपिलला दोघं शूटला येतील, असा आत्मविश्वास होता. पण तसं काही झालं नाही. ना डाॅक्टर मशहूर गुलाटी आले, ना रिंकू भाभी आणि ना चायवाला चंदन.

चंदन प्रभाकर म्हणाला की त्याला कपिलचा फोन आला होता. पण चंदननं शोवर यायला नकार दिला. आॅस्ट्रेलियाला झालेल्या शोमध्ये चंदनला कपिलचा वाईट अनुभव आला होता. कपिलनं चंदनला धमकी दिली होती. तो कपिलचा मित्र आहे, म्हणून या शोमध्ये आहे, असंही म्हटलं होतं.

त्यामुळे आता चंदन 'कपिल शर्मा शो' सोडून जाणार की काय अशी चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close