S M L

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी अनिर्णित

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2017 11:38 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी अनिर्णित

20 मार्च :  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रांचीत खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात ऑस्ट्रेलिया यश मिळालंय.

शॉन मार्श आणि हँन्डस्कोंबच्या जोडीने सातव्या विकेटसाठी भागीदारी रचत सामना अनिर्णीत ठेवला. दरम्यान भारताने आपला पहिल्या डाव ६०३ धावांवर घोषित केला होता. चेतेश्वर पुजारा आणि वृद्धीमान साहा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर १५२ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला रवींद्र जडेजाने चांगलाच दणका दिला.

सलामीवीर रॅनशॉसह, वॉर्नर आणि स्टीव्ह स्मीथ आणि लिऑनला स्वस्तात माघारी पाठवून जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉन मार्श आणि हँन्डस्कोंबच्या जोडीने ऑस्ट्रेलियाची बाजू सावरल्यामुळे दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने २०४ धावा करून डाव अनिर्णीत ठेवला. भारताने दुसरी कसोटी आणि आस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकल्यामुळे तीन सामन्यात बरोबरीत सुटली आहे. आता चौथ्या कसोटीत दोन्ही संघाची 'कसोटी' लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close