S M L

ऐश्वर्याला पितृशोक, कृष्णराज राय यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Mar 18, 2017 09:17 PM IST

 ऐश्वर्याला पितृशोक, कृष्णराज राय यांचं निधन

18 मार्च : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांचं निधन झालंय. शनिवारी संध्याकाळी लीलावती हाॅस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर लीलावती हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

जानेवारीमध्ये कृष्णराज राय यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लीलावती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी ऐश्वर्या दुबईला होती. कृष्णराज राय यांची माहिती मिळताच सुट्ट्या रद्द करून ऐश्वर्या मुंबईत आली होती.   कृष्णराज राय यांच्या आजारपणाच्या कारणामुळे यावेळी बच्चन कुटुंबियाच्या घरी होळी खेळण्यात आली नाही. स्वत: अमिताभ बच्चन यांनीच ही माहिती दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 09:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close