S M L

विरोधकांकडून अर्थसंकल्पाची होळी

Sachin Salve | Updated On: Mar 18, 2017 07:06 PM IST

विरोधकांकडून अर्थसंकल्पाची होळी

18 मार्च : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारला धारेवर धरलेल्या विरोधकांनी दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची टीका करत अर्थसंकल्पाच्या प्रतींची होळी केलीये.

सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली तेव्हा आज विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुनगंटीवार यांचं अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत टाळ कुटत कर्जमाफीची घोषणाबाजी केली. सभागृह बाहेर आल्यानंतर विरोधकांनी अर्थसंकल्पावरुन फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर आमदारांनी अर्थसंकल्पाची होळी केली.

हा अर्थसंकल्प दीशाहीन आहे अशी टीका शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केलीय. तर भविष्याचा विचार न करता मांडला गेलेला अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी दिलीय. तर शिवसेना कर्जमाफी न दिल्यामुळे नाराज आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम असल्याचं सेना आमदार सुनील प्रभू म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 07:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close