S M L

मुंबईत एटीएम व्हॅनवर दरोडा, दीड कोटी लुटले

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2017 09:49 PM IST

मुंबईत एटीएम व्हॅनवर दरोडा, दीड कोटी लुटले

16 मार्च : मुंबईतल्या धारावीमधून एटीएमसाठी पैसे पुरवणाऱ्या व्हॅनमधून तब्बल दीड कोटी रूपये लंपास केल्याची खळबळजनक घटना घडलीये.

धारावीतल्या स्टेट बँकेच्या एटीएमध्ये पैसे भरण्यासाठी ही व्हॅन आली असताना शस्त्रांच्या धाकावर चोरट्यांनी पूर्ण पेटीच पळवून नेली. पेटी पळवत असतानाचं सीसीटीव्ही फुटेजही बाहेर आलंय. त्यात दोन तरूण पेटी नेताना दिसत आहेत.पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. मात्र या घटनेनं एटीएम सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 09:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close