S M L

बीडवर अस्मानी संकट, 1 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान

Sonali Deshpande | Updated On: Mar 16, 2017 08:07 PM IST

बीडवर अस्मानी संकट, 1 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान

beed new

16 मार्च : अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मराठवाड्यातला शेतकरी हवालदिल झालाय. टरबूज-खरबूजाचं लाखो रूपयांचं नुकसान झालंय. माजलगाव,धारूर,केज,परळी,बीड या तालुक्यांना या गारपिटीचा सगळ्यात मोठा फटका बसलाय. प्राथमिक अंदाजानुसार किमान एक लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत.

तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकरी यंदा झालेल्या पावसानं खूश झाला होता. मात्र काल (बुधवारी) अचानक आलेल्या वादळी पावसानं आणि गारपिटीमुळे हे स्वप्न मातीत मिसळलंय. जिल्ह्यात पाच ते सहा तालुक्यात मिळून जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 07:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close