S M L

आमिरच्या बर्थडे पार्टीत शाहरूखची उपस्थिती

Sonali Deshpande | Updated On: Mar 16, 2017 03:09 PM IST

आमिरच्या बर्थडे पार्टीत शाहरूखची उपस्थिती

16 मार्च : नेहमी एकमेकांपासून दूर राहणारे शाहरूख आणि आमिर खान. पण आता चित्र बदललंय. शाहरूख खान आमिरच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोचला.

अनेक दिवस या दोघांमधल्या दुष्मनीचे किस्से चघळले जायचे. पण आता आमिर आणि शाहरूख यांच्यात मैत्री वाढतेय. 'दंगल'नंतर शाहरूख आणि आमिर अनेकदा एकत्र आले. कधी दुबईच्या पार्टीत तर कधी शाहरूखच्या घरी नेटफिलिक्सच्या करारावर चर्चा करायला.

आमिर म्हणाला,'शाहरूखसोबतची माझी मैत्री जुनी आहे. त्यामुळे तो वाढदिवसाला आला या मागे आमची मैत्रीच आहे.'

तरीही दोघं एकत्र काय प्रोजेक्ट करतायत का, याची उत्सुकता सगळ्यांना आहे. शेवटी दोघांच्या फॅन्सना दोघांचा एकत्र सिनेमा पाहायचा आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close