S M L

कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी देणार का?- मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2017 01:12 PM IST

कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी देणार का?- मुख्यमंत्री

16 मार्च :  राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविरोधात नाही. पण बँकेतील घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे. कर्जमाफी केल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधक देणार का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

गुरुवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मागणीवर विधानसभेत उत्तर दिलं.

दुष्काळानंतर भाजपने थेट 8 हजार कोटी रुपये दिले आहेत. पण विरोधकांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. कर्जमाफी आवश्यक आहेच पण कर्जमाफी केल्यास राज्यासाठी पैसाच उरणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं. त्याचबरोबर, राज्याची आणि शेतकऱ्यांची दुबळी झालेली आर्थिक स्थिती ह्या विरोधकांमुळेच झाल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान विरोधक आक्रमक होते. विधानसभा अध्यक्षांसमोर येऊन विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा बाजी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close