S M L

नवी मुंबईतल्या 29 प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचा एल्गार

Sonali Deshpande | Updated On: Mar 14, 2017 07:58 PM IST

नवी मुंबईतल्या 29 प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचा एल्गार

14 मार्च : नवी मुंबईत राज्य सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी 29 गावातील हजारो प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरले होते.कोकण आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

 

महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत इमारतींवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.राज्य सरकारच्या विरोधात हा 29 गावांमधील प्रकल्पग्रस्तांचा एल्गार होता. 45 वर्ष उलटूनही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित असल्याने त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं.

 

यावेळी राष्ट्रवादी नेते गणेश नाईक यांनी सरकारवर टीका केली. सरकारला काही द्यायचंच नाहीय, असाआरोप त्यांनी केला. तर काँगेस नेते दशरथ भगत यांनी कोर्टाला मध्ये आणण्यापेक्षा सरकारनंच घरं नियमित करावी,असं म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 06:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close