S M L

गोमूच्या घुंगरांनी शिमगोत्सवाला आलीय रंगत

Sonali Deshpande | Updated On: Mar 12, 2017 12:05 PM IST

गोमूच्या घुंगरांनी शिमगोत्सवाला आलीय रंगत

12मार्च : 'गोमूच्या' पायातील घुंगरांच्या आवाजाने आणि नाचाने कोकणातील शिमगोत्सवाला खरी रंगत निर्माण होते. कोकणातील शिमगोत्सवाचे वेगळेपण काही निराळेच असते. शिमगोत्सवात कोकणात वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात त्यातलीच एक म्हणजे

'गोमूचा नाच'.शेकडो वर्षांपासून गोमूच्या नाचाची ही आगळी वेगळी परंपरा कोकणातील शिमगोत्सवाचं मुख्य आकर्षण असते.रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये तितक्याच भक्तिभावाने आजही ती जोपासली जाते.

शिमगोत्सवामध्ये होळीच्या कालावधीत गावागावातील मंडळाच्या वतीने 'गोमूचा नाच' खेळला जातो, शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा काही निराळीच आहे, एका मुलाला एका स्त्रीचा वेष परिधान केला जातो, साडी नेसवली जाते, पायात घुंगरू घातले जातात आणि या गोमूला म्हणजेच पात्राला गावागावात आणि संपूर्ण शहरात फिरवलं जातं.

घरांसमोर तसंच दुकानांसमोर त्याचे नाच केले जातात, लोक धार्मिक भावनेतून त्यांना दक्षिणा देतात अशा प्रकारे जमा झालेली दक्षिणा एकत्र करून त्याचा नैवेद्य केला जातो आणि तो घरी नेला जातो. गावागावात, दुकानांसमोर संकासुर, तसंच राधा-कृष्णची गाणी, ढोलकी,टाळ,तुणतुण्याच्या तालावर म्हटली जातात.

गोमूच्या पायातील घुंगराच्या आवाजाने शिमगोत्सवाला खेडमध्ये चांगलीच रंगात अाली आहे.अशा प्रकारचे कार्यक्रम रंगपंचमी पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आयोजित केले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close