S M L

सांगली तशी चांगली, मुलगी झाली म्हणून हत्तीवरुन साखर वाटली

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2017 06:55 AM IST

सांगली तशी चांगली, मुलगी झाली म्हणून हत्तीवरुन साखर वाटली

10 मार्च : डाॅक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या डाॅ.खिद्रापुरेमुळे म्हैसाळ गावासह सांगलीची मान शरमेनं खाली झुकली. पण, त्याच सांगली तशी चांगली असं सांगत मुलगी झाली म्हणून हत्तीवरुन साखर वाटण्याची अभिमानास्पद घटना घडलीये.

सांगली जिल्ह्यात म्हैसाळ गर्भपात प्रकरणाने संबंध समाजमनाला धक्का दिला. मात्र दुसरीकड़े याच जिल्हयात एका युवकाने मुलगी झाली म्हणून हत्तीवरुन साखर वाटलीय. अवधूत कदम हे सांगलीतील पंचमुखी मारुती रोड वरील लाळगे गल्लीत राहतात. गेल्या महिन्यात त्यांना मुलगी झाली. [wzslider]

या लहानग्या मुलीचं आज बारसं होतं. यानिमित्तानं मुलगी झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी संपूर्ण गावात हत्तीवरुन साखर वाटली. मुलगी ही लक्ष्मी असते, तिचा तिरस्कार करू नका, तर तिच्या जन्माच स्वागत करा असा, सामाजिक संदेश कदम परिवारानं दिलाय.  यावेळी सुखटनकर आणि कदम परिवारातले सगळे सदस्य उपस्थित होते. अवधूत यांच्या या कृत्याचं ग्रामस्थानींही स्वागत केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 08:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close