S M L

7 ते 9 एप्रिलऐवजी आता 21 ते 23 एप्रिल रोजी रंगणार नाट्य संमेलन

Sonali Deshpande | Updated On: Mar 7, 2017 11:12 AM IST

7 ते 9 एप्रिलऐवजी आता 21 ते 23 एप्रिल रोजी रंगणार नाट्य संमेलन

07 मार्च : उस्मानाबाद इथे होणारे 97 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुढे ढकलले आहे. हे संमेलन 7 ते 9 एप्रिल दरम्यान होणार होते. पण आता हे नाट्य संमेलन 21 एप्रिल ते 23 एप्रिल या काळात होणारेय.मुंबई इथे बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.

प्राथमिक आणि माध्यमिक परीक्षामुळे नाट्य संमेलन पुढे ढकलले आहे. उस्मानाबादमधल्या स्थानिक आयोजकांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आलाय. संमेलन परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी ही माहिती दिली.

नाट्यकर्मी जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close