S M L

भिवंडीत पुन्हा पोलिसावर हात उचलला, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

Sachin Salve | Updated On: Mar 2, 2017 08:49 PM IST

भिवंडीत पुन्हा पोलिसावर हात उचलला, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

02 मार्च : भिवंडीमध्ये पुन्हा एकदा वाहतूक पोलिसावर हात उचलला गेला. भिवंडी एसटी स्टँडसमोर रविकांत पाटील या वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकाने मारहाण केली.

भिवंडीमधील एसटी बस स्थानकाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस काँन्सटेबर रविकांत पाटील यांनी रिक्षाचालक शफिक शेखला हटकलं. शफिकने बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोराच रिक्षा आडवी लावली होती. पाटील यांनी रिक्षा बाजूला करण्यास सांगितले असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाची रुपांतर हाणामारीत झाले.  रिक्षाचालक शफिक शेखवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पुन्हा एकदा पोलिसाला मारहाणीच्या प्रकरणामुळे पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 08:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close