S M L

नोटबंदीनंतरही जीडीपी 7 टक्क्यांवर

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2017 09:47 PM IST

नोटबंदीनंतरही जीडीपी 7 टक्क्यांवर

28 फेब्रुवारी : नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल अशी भीती असताना मोदी सरकारला मात्र, मोठा दिलासा मिळालाय. आर्थिक वर्ष आॅक्टोबर आणि डिसेंबरमध्ये जीडीपीमध्ये किंचित बदल झाला असून तो 7 टक्क्यांवर आलाय.

आॅक्टोबर ते डिसेंबर 2016 या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन जीडीपी जाहीर करण्यात आलाय. या तीन महिन्यात जीडीपी 7 टक्के इतके राहिलाय. या आधीच्या तीन महिन्यांमध्ये हा दर 7.4 टक्के एवढा होता. तो विकासदर आता 7 टक्क्यांवर आलाय. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण आलाय. त्यामुळे विकासदर मंदावल्याचं मानलं जातंय. पण हा तात्पुरता परिणाम आहे आणि या वर्षीचा विकासदर 7.5 टक्क्यांच्या जवळ राहिल असं सरकारचं म्हणणं आहे. असं असलं तरी भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात सर्वाधिक वेगानं विकासित होणाऱ्या अर्थव्यवस्थेत  पहिला क्रमांक लागतो. चीनची अर्थव्यवस्थेचा विकासदर 6.8 टक्के एवढा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 09:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close