S M L

एक्झिट पोल : ठाण्यात शिवसेनाच, भाजप दुसऱ्या क्रमांकावर ?

Sachin Salve | Updated On: Feb 22, 2017 06:30 PM IST

एक्झिट पोल : ठाण्यात शिवसेनाच, भाजप दुसऱ्या क्रमांकावर ?

21 फेब्रुवारी : 'ठाणे शिवसेनेचं खणखणीत नाणं' असं नेहमी म्हटलं जातं.  अॅक्सिस - इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलमध्येही शिवसेनेलाच कौल देण्यात आलाय.

ठाण्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व कायम राहणार, असं दिसतंय. शिवसेनाला सर्वाधिक 62 ते 70 जागा मिळण्याची शक्यता आहे.  शिवसेनेनंतर भाजपचा दुसरा क्रमांक राहील. भाजपला 26 ते 33 जागा मिळतील.  तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर असेल, असं हा सर्व्हे सांगतो. काँग्रेसला मात्र अगदीच मोजक्या जागा मिळतील, अशी चिन्हं आहेत. ठाण्यामध्ये एकूण 131 जागा आहेत.

अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल

- शिवसेना - 62 ते 70

- भाजप - 26 ते 33

- राष्ट्रवादी - 29 ते 34

- काँग्रेस - 2 ते 6

ठाणे - सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 08

राष्ट्रवादी काँग्रेस 34

काँग्रेस 18

शिवसेना 53

मनसे 07

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 09:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close