S M L

पैसे वाटणाऱ्याला मतदारांनीच कपडे फाटेपर्यंत धुतलं

Sachin Salve | Updated On: Feb 21, 2017 08:15 PM IST

  पैसे वाटणाऱ्याला मतदारांनीच कपडे फाटेपर्यंत धुतलं

21 फेब्रुवारी : निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना प्रलोभनं दाखवण्याच्या अनेक घटना घडल्या. मात्र थेट मतदानाच्या दिवशी पैसे वाटणाऱ्याला ठाण्यात मतदारांनीच बेदम मारहाण केली.

ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक शहाजी जावीर यांना पैसे वाटताना मतदारांना कपडे फाटेपर्यंत मारलं. वागळे इस्टेटच्या अंबिका नगर प्रभाग क्रमांक 17 मध्ये ही घटना घडली.

जावीर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहे. जावीर यांना पोलिसांनी पैसे वाटण्यासाठी आणलेल्या यादीसोबतच ताब्यात घेतलं. त्यामुळे लोकशाहीमध्ये असे प्रकार घडतातच कसे ? असा सवाल ठाणेकर करतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 08:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close