S M L

या आठवड्यात 4 दिवस बँकांना सुट्टी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 20, 2017 04:12 PM IST

या आठवड्यात 4 दिवस बँकांना सुट्टी

19 फेब्रुवारी :  या आठवड्यात तुमची बँकेची काही कामं असतील तर ती आज (सोमवारी), बुधवारी आणि गुरुवारीच आटोपून घ्या. याचंही कारण म्हणजे या आठवड्यात बँकांना 4 दिवस सुट्टी आहे.

राज्यातील महानगरपालिक आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या उद्या 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व बँकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवार आणि गुरूवारी बँक सुरू राहणार आहे.

शुक्रवारी महाशिवरात्री आहे, त्यामुळे या दिवशीही बँक बंद राहणार आहे. त्यानंतर चौथा शनिवार आल्याने ती सुट्टी आणि रविवारी. अशी सलग तीन दिवस बँकेला सुट्टी असणार आहे.

सलग सुट्ट्या आल्यानं ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी बँकेची काही महत्त्वाची कामं या मधल्या तीन दिवसांतच आटोपून टाका.

 या दिवशी बँका सुरू राहणार

  • सोमवारी - बँका सुरू
  • मंगळवारी - मतदानासाठी सुट्टी
  • बुधवारी आणि गुरूवारी - बँका सुरू
  • शुक्रवारी - महाशिवरात्रीची सुट्टी
  • शनिवार - चौथा शनिवारची सुट्टी
  • रविवार - साप्ताहिक सुट्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close